छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य - जाणता राजा युवा प्रतिष्टान

छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य -

शिवाजी महाराज स्वराज स्थापन आरंभ
:पुणे, सुपे, इंदापूर, सुभे या प्रदेशाचे
ठोकळ क्षेत्रफळ २३०० चौरस मैल आहे.
तीस वर्षांत विस्तार कल्याण ते गोवे,
भीमा ते वारणा यांमधील १५००० चौरस मैल
,आणि शिवाजी महाराजांच्या
मृत्यूच्या वेळी तर पुढील प्रांताचा
समावेश मराठी राज्यांत झाला होता,
मावळ, वाई, सातारा, पन्हाळा,
दक्षिणकोकण, बागलाण, त्र्यंबक,
धारवाड, बिदनूर, कोलार, श्रीरंगपट्टण,
कर्नाटक, वेलोर व तंजावर या देशांतील
मिळून एकंदर २६७ किल्ले. राज्याची
ठोकळ चतुःसीमा पूर्वेस भीमा;
पश्चिमेस अरबी समुद्र; उत्तरेस
गोदावरी; व दक्षिणेस कावेरी होय. या
एकंदर प्रदेशाचे क्षेत्रफळ साधारणपणे
१२०००० चौरस मैल येईल .

संदर्भ: महाराष्ट्रीय ज्ञानकोश खंड १८
बडोदे – मूर (१९२६)

भारतीय प्रजासत्ताक ३ फेब्रुवारी २०१५
क्षेत्रफळ :१२,६९,२२० चौ मैल ( संदर्भ :
विकीपीडीया )
१२००००/१२६९२२० x१०० = ९.४५५%

महाराज मृत्युसमयी एकुण भारताच्या
९.५ टक्के भाग स्वराजात होता .

भारतात सध्या ६७६ जिल्हे आहेत
म्हणजेच शिवस्वराज्याचे एकुण
क्षेत्रफळ आजच्या ६५ जिल्हयाएवढे
होते.

No comments:

Post a Comment