जाणता राजा युवा प्रतिष्टान

तुमच्या शहरात , गावात शिवरायांच्या नावाने असणाऱ्या ठीकाणांना तुम्ही काय म्हणता?? 
शिवाजी चौक..., शिवाजी रोड...शिवाजी नगर...शिवाजी पार्क 
तुमची जीभ झडते का छत्रपती, महाराज, राजे, शिवराय हे शब्द वापरायला ? वगैरे वगैरे …. 

खरंतर आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा सोडून
आपण नको ते धंदे करत बसलो आहोत

छत्रपति शिवाजी महाराजांचे मुळ नाव "शिव" आहे
अगदी शिवा"जी" शब्दात हि खूप आदर आहे

शिवाजी महाराजांची राजमुद्रा असो किंवा शिवराई असो
हि तुम्ही पहिली असेलच,
शिवराई नाण्यावरती महाराजांचा उल्लेख राजा "शिव" छत्रपति असा आहे.
तसेच राजमुद्रेवर महाराजांचा उल्लेख "शाहसूनोः "शिव"स्यैषा" असा आहे

मग असे म्हणा आणि तसे नका म्हणू ! हा बाजार कशासाठी ?

हिमाचल पासून महाराष्ट्र पर्यंत काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत
हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात छत्रपतीं बद्दल नितांत आदर आहे
फक्त तो आदर व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे …

असे बोलले तर अपमान होईल , तसे बोलले तर बरे होईल …
हे कुणीही लादू शकत नाही

शिवरायांचे मुळ नाव "शिव" होते
त्यामुळे शिवाजी हा शब्द सुद्धा आदरयुक्तच आहे

या मातीत जन्माला येणाऱ्या पोराला सांगावं लागत न्हाय,
जय भवानी म्हटलं कि पुढं जय शिवाजी गर्जना हाय !

No comments:

Post a Comment