poem on Teacher in Marathi (गुरूजी )

गुरूजी 🎭

शाळांना जर का शिक्षक 
लाभला नसता तर 
आयुष्याच्या गणिताचा 
भूगोल झाला असता
फळयावर जर खडूचा हात फिरला नसता
तर abcd बाराखडीचा अर्थ कळला नसता

डोळे भरून येतात जेव्हा 
हातात पगार येतो
गुरूजी तुम्हीच आकार दिला.
मातीचा मी गोळा होतो.
पायथागोरस आर्केमिडिज् न्यूटन
अजूनही तोड़पाठ आहेत गुरूजी
तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या रेणुसूत्रात
मला तुम्हीच दिसतात गुरूजी......

तुमच्या हातून खाल्लेला मार
आजपर्यन्त विसरलो नाही मी
घोड़ी करुन उभे करायचात तुम्ही
आता तीच पद्धत व्यायामाला वापरतो मी
शाळा चुकवायचो कित्तेकदा 
उनाडक्या करतांना
पण भीति वाटायची तुमची
गृहपाठ तपासतांना

आज मात्र तुम्ही Wats ap वर 
चेष्टेचा विषय झालात
,"मास्तर कोमात; गुरूजी जोमात. 
मास्तर पळाला; यात्रेला गेला 
असल्या कमेंट्स"
जेव्हा तुमचेच भाऊबंद करतात. 
काळीज फाटतय हो गुरूजी 
आमच्या आदर्शाच मातेरं होताना. 
पण गुरूजी फीकर नाय;

तुमची प्रतिमा मात्र माझ्या हृदयात
आदरणीयचं राहिल.
मी साक्षर फक्त तुमच्या मुळे झालो
ही जाणीव माझ्या शेवट पर्यन्त राहील.
सूचना:- शिक्षकान वर फालतू विनोद करू नयेत जान ठेवा जरा


No comments:

Post a Comment