शेतकरयाचा वाघ --जाणता राजा युवा प्रतिष्टान

एका शेतकरयाचा मुलगा अमरीकेहुन MBA करुनआला. शेतकरयाची बैल असलेली तेलाची घानीहोती.मुलगा तिथे गेला. शेतकरी घानी बाहेरबसलेला असतो.
मुलगा: बाबा, आपन हा बैल
विकून तीथे मशीन लावु या. तुम्हाला जास्त
फायदा होईल.
शेतकरी : पण मशीन जे काम करु
शकतो तो माझा बैल पण करु शकतो .
(हँक......बैलाला संबोधुन)
मुलगा : पण बैल कामचुकारपणा
करु शकतो. मशीन नाही...
शेतकरी : माझा बैल तस करत नाही.
मुलगा : ते कस.. ? तुम्हाला बाहेर बसुन
कस कळत की तो आत मध्ये कामचुकारपणा
करत नाही ?
शेतकरी : काय आहे की... बैल जर
चलायचा थांबला तर गळ्यातील घंटी वाजत नाही..
मी हैक केल की तो चालू लागतो .
मुलगा : पण तुम्हाला कस कळत की तो चालतच आहे. तो
जागच्या जागी थांबून मान पण हालवु शकतो
आणी गळयातील घंटा वाजेल...
शेतकरी : (थोडस हासत...)
बाळा माझा बैल MBA झालेला नाही.
--जाणता राजा युवा प्रतिष्टान



No comments:

Post a Comment